पुणे

Pro Kabaddi Competition : हरियाणा स्टीलर्स चौथ्या लढतीतही अपराजित

दिनेश चोरगे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स सर्वांगसुंदर खेळाचे दर्शन घडवताना गुजरात जायंटसचे आव्हान ३१-२९ असे मोडून काढताना सलग चौथ्या विजयाची नोंद केली. (Pro Kabaddi Competition)

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत हरियाणा संघाने सुरुवातीपासूनच वेगवान खेळताना ५-१ अशी झटपट आघाडी घेतली. परंतु फजल अत्राचलीच्या सुपर टॅकल सह रोहीत गुलियाच्या चढाईमुळे जायंटसने लवरकरच बरोबरी साधली. यावेळी मोहीत नंदालच्या उत्कृष्ट पकडीमुळे हरियाणा संघाने पुन्हा वर्चस्व मिळवले. (Pro Kabaddi Competition)

विनयच्या अप्रतिम चढाईमुळे हरियाणा संघाने १९ व्या मिनिटाला गुजरात जायंटसवर लोन चढवला आणि मध्यांतराला १७-१० अशी आघाडी घेतली. गुजरात संघाला पूर्वार्धात चढाईचे केवळ पाच गुण मिळवता आले तर हरियाणा करून केवळ मोहितने एकट्याने पाच पकडी केल्या. रोहितने केलेल्या सुपर रेडमुळे गुजरातची पिछाडी १५ -१९ अशी कमी झाली, तर मोहंमद नबिबक्ष याच्या पकडीमुळे उत्तरार्धातील पहिल्या १० मिनिटात १० गुण मिळवून गुजरातने जोरदार पुनरागमन केले. सोनू जगलानने मैदानात परतताना एका अफलातून बॅक किकच्या साहाय्याने गुजरातला २४-२४ अशी बरोबरी साधून दिली. तेव्हा केवळ ७ मिनीटे बाकी होती. याच वेळी हरियाणा संघाने दडपण उत्तम हाताळताना सरस कामगिरी केली. आशिषने सोनूची महत्वपूर्ण पकड केली तेव्हा ६० सेकंद बाकी होते. आणि पाठोपाठ विनय अखेरच्या चढाईत दोन गुण मिळवताना हरियाणा स्टीलर्स च्या विजयाची नसीचीती केली. (Pro Kabaddi Competition)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT