पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी जागेतील नाल्यांवर बंधारे बांधताना संबधित भोगवटादाराकडून स्टॅम्पपेपरवर पूर्वपरवानगी घेऊन त्याची नोटरी करावी, असे आदेश मृद् व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रकाश पाटील यांनी दिले आहेत. राज्यात मृद व जलसंधारण विभागाकडून 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेचे विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात येतात. त्यापैकी 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, सिमेंट साठवण बंधारे, सिमेंट नाला बांध या कामांची शासन, महामंडळ, जिल्हा परिषद, जिल्हा वर्षिक योजना या निधीतून अंमलबजावणी करता येते.
स्थानिक पातळीवर मागणी व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन अशा प्रकारातील बांधकामे ही नदी किंवा नाले, ओढ्याच्या पात्रात करण्यात येतात. अशा ठिकाणी भूसंपादन करण्याची गरज लागत नाही. मात्र, खासगी क्षेत्रात बांधण्यात येणा-या अशा प्रकारच्या बंधा-यांचे काम करताना शासनाने आता नवीन नियमावलीचे पालन करण्याचे आदेश काढले आहेत.
हेह वाचा