पुणे : पुणे दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी एनडीएच्या 145 व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडचा आढावा घेतला. राष्ट्रपती 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 डिसेंबर रोजी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात 'प्रेसिडेंट्स कलर' सादर करतील.
अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी गुरुवारी सकाळी खडकवासला, पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 145 व्या अभ्यासक्रमाच्या 'पासिंग आऊट परेड'चा आढावा घेतला. यादरम्यान त्या आगामी 5 व्या बटालियनच्या इमारतीची पायाभरणीही करणार आहेत.
मुर्मु यांचा पुढील कार्यक्रम असा असेल.
राष्ट्रपती भवनानुसार, मुर्मू 1 डिसेंबर रोजी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात 'प्रेसिडेंट्स कलर' सादर करतील. तसेच त्या राष्ट्रपती 'प्रज्ञा' या आर्म्ड फोर्सेस सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल मेडिसिनचे डिजिटली उद्घाटनही करणार आहेत. त्याच दिवशी नागपुरमध्ये मुर्मू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन सुद्धा करणार आहेत. तसेच 2 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा.