Pune News Pudhari
पुणे

Pune News: प्राजित नायर महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त

सध्या गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यरतअसलेले नायर आता पुणे महापालिकेतील जबाबदारी सांभाळणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य शासनाने प्रशासनातील महत्त्वपूर्ण फेरबदल करत 2017 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी प्राजित नायर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सध्या गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यरतअसलेले नायर आता पुणे महापालिकेतील जबाबदारी सांभाळणार आहेत.

प्राजित नायर यांनी 2017 च्या आयएएस तुकडीतून प्रशासनात प्रवेश केला असून, विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांमध्ये महापालिकेच्या कामकाजाचे नियोजन, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे, शहरविकास प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच नागरिकांशी प्रभावी समन्वय साधणे या बाबींचा समावेश असेल.

जिल्हाधिकारीपदासह विविध प्रशासकीय स्तरांवर काम करताना नायर यांनी व्यापक अनुभव मिळवला असून, त्या अनुभवाचा उपयोग पुणे महापालिकेच्या कारभारात होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी

राज्य शासनाने आणखी एक प्रशासकीय फेरबदल करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथील अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बदलांमुळे पीएमआरडीएमधील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहर विकासाशी संबंधित प्रकल्प, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापन यामध्ये सुधारणा होऊन पुणे महानगर क्षेत्रातील एकूणच विकास प्रक्रियेला चालना मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT