प्रधानमंत्री आवास योजना Pudhari File Photo
पुणे

‌Pradhan Mantri Awas Yojana Pune: ‘प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेचा लाभ घ्यावा‌’

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी संधी; ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर उपलब्ध घरे

पुढारी वृत्तसेवा

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत पुणे म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी पुणे शहरात एकूण 57 घरकुले राखीव ठेवण्यात नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत पुणे मंडळातर्फे परवडणारी घरे योजनेअंतर्गत एकूण 12 प्रकल्पामध्ये एकूण 2 हजार 398 घरकुल बांधकाम पुणे म्हाडामार्फत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) परवडणारी घरे योजना घटकांतर्गत म्हाडाच्या पुणे

मंडळातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी घरकुले राखीव ठेवण्यात आली आहेत. या योजनांची कामे पूर्ण होऊन सद्यःस्थितीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिका उपलब्ध आहेत.

या योजनेचा लाभ घेताना अर्ज करण्यासाठी मुख्य कार्यकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा), गृहनिर्माण भवन, आगरकरनगर, पुणे-1 या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रधानमंत्री आवास योजना- शहरी 2.0 या मार्गदर्शिकेचेही अवलोकन करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT