पुणे

पिंपरी : बदलून आलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत पदस्थापना

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील नव्याने तसेच पदोन्नतीने हजर झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या पदस्थापना करण्यात आल्या. तसेच, तीन जणांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी शुक्रवारी (दि. 26) याबाबतचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी- चिंचवड शहर पोलिस दलात नव्याने बदलीवर चार सहाय्यक पोलिस आयुक्त हजर झाले आहेत. तसेच, हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. या पाच सहाय्यक पोलिस आयुक्तांची अंतर्गत पदस्थापना करण्यात आली. आयुक्तालयातील अन्य तीन सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • सहायक पोलिस आयुक्त (पदस्थापनेचे ठिकाण)
  • विशाल शामराव हिरे (पिंपरी विभाग)
  • राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर (चाकण विभाग)
  • बाळासाहेब दिनकर कोपनर (विशेष शाखा)
  • भास्कर प्रभाकर डेरे (प्रशासन)
  • विठ्ठल खंडूजी कुबडे (वाहतूक विभाग)
  • प्रेरणा जीवन कट्टे (गुन्हे 1)
  • सतीश दत्तात्रय माने (गुन्हे 2)
  • पद्माकर भास्करराव घनवट (देहूरोड)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT