पुणे

पुणे : कसब्यातील 19 हजार मतदारांना करता येणार टपाली मतदान

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 80 पेक्षा अधिक वय असणारे सुमारे 19 हजार मतदार आहेत. या ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत केवळ 49 जणांनी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार सुविधा केंद्रात निवडणुकांवर भर दिला जात आहे.

मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, शारीरिक विकलांग नागरिक आदींना मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात  येत आहे.
कसबा, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या, तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जनजागृती करीत आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या, तसेच दिव्यांग मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून 'नमुना 12-डी' अर्ज भरून घेतला जात आहे. अशाप्रकारचा अर्ज कसब्यातून आतापर्यंत 49 नागरिकांनी भरून दिला आहे.

SCROLL FOR NEXT