पुणे

पुणे : प्रदूषण, धूम्रपानामुळे होतोय ‘काळा दमा’

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सीओपीडी (क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिझ) म्हणजेच काळा दमा असलेल्या रुग्णांना तीव्र कोरोना संसर्ग झाला. प्रदूषण, तसेच धूम्रपानामुळे काळा दमा होतो आणि फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. अशा रुग्णांचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करणे हे आव्हान असल्याचे डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.

दरवर्षी 16 नोव्हेंबर हा जागतिक सीओपीडी डे अर्थात क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिझ दिवस म्हणून साजरा केला जातो. आजारासंबंधी जनजागृती, वेळेत निदान आणि उपचारांबाबत माहितीचा प्रचार आणि प्रसार हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
सीओपीडी या आजारात रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.

श्वासाद्वारे फुप्फुसांमध्ये प्रदूषण, धूर अथवा धूम्रपानामुळे अशा कारणांनी कार्बन मोनोक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड, धुलीकण प्रवेश करतात. फुप्फुसांची लवचिकता कमी होते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. सीओपीडीच्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी फ्लूची लस देणे तसेच जिवाणूजन्य आजारांपासून संरक्षण देणे आवश्यक असते.

प्रदूषण, धूम्रपान ही सीओपीडीची प्रमुख कारणे आहेत. यामध्ये फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. हा आजार सामान्यत: चाळिशीनंतर उदभवतो. रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. श्वसननलिका मोकळी होण्यासाठी दिली जाणारी औषधे, श्वसनाचे व्यायाम आणि आजारातील गुंतागुंत वाढल्यास स्टिरॉईडस असे उपचार रुग्णांवर केले जातात. – डॉ. पराग खटावकर, चेस्ट फिजिशियन

ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये लंग फायब्रोसिस, सीओपीडी असे आजार दिसून येत आहेत. फुप्फुसांची क्षमता कमी झाल्याने प्रतिकारशक्ती कमी होते आणि कोणताही संसर्ग पटकन होण्याचे प्रमाण वाढते. दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.
                                                      – डॉ. अनिल मांडके, चेस्ट फिजिशियन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT