पेठा, झोपडपट्ट्यांतील मतदान File Photo
पुणे

Maharashtra Assembly Polls : पुण्यातील पेठा, झोपडपट्ट्यांतील मतदान ठरणार निर्णायक

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

शिवाजी शिंदे

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आहे. पेठा, झोपडपट्ट्या आणि कोरेगाव पार्क या उच्चभ्रू सोसायट्यांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस की भाजपा यापैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही राजकीय पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी आमदारांपासून नगरसेवकांपर्यंत सर्वांचीच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

राज्यात मागील दोन ते अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी झाल्या. परिणामी, सत्तेवर येण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार निवडून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे. परिणामी, पुणे कॅन्टोन्मेंट विधासभा मतदारसंघालाही खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, हा विधानसभा मतदारसंघ पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असून, झोपडपट्ट्या, पेठा यांची संख्या जास्त आहे. त्यातच विविध जातीधर्मांचे नागरिक अतिशय गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. विविध सण, एकत्र येऊन साजरे करणे हेच या विधानसभा मतदारसंघातेल नागरिकांचे वैशिष्ट्य आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात डायस प्लॉट, काशेवाडी, हरकानगर, मोदी खाना, भीमपुरा, चुडामन तालीम, ससून क्वॉर्ट्स, ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, कोरेगाव पार्क, बी. टी. कवडे रोडचा काही भाग, घोरपडी, वानवडी, (जगताप चौकापर्यंत), पूर्ण कॅम्प भाग, सोलापूर बाजार, गुलटेकडी हा भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघातील बहुतांश भागात झोपडपट्ट्या आणि पेठा आहेत. या मतदारसंघात मध्यमवर्गीय, मजूरवर्ग जास्त प्रमाणात आहे. तर पूर्व भागाकडे कोरेगाव पार्क भाग असून, या भागात उद्योजक आणि व्यावसायिक तसेच शासकीय, केंद्राच्या विविध विभागांत कार्यरत असलेले अधिकारी या भागात वास्तव्यास आहेत.

या मतदारसंघात कचर्‍याची सर्वात मोठी समस्या आहे. ड्रेनेज लाइनची असुविधा, पाण्याचा प्रश्न, रस्त्याची दुरवस्था यासह अनेक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT