Daund Samadhan Lodge Raid Pudhari Photo
पुणे

Daund Samadhan Lodge Raid: दौंड-पाटस रस्त्यावरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; समाधान लॉजवर पोलिसांचा छापा

६ महिलांची मुक्तता

पुढारी वृत्तसेवा

दौंड: दौंड-पाटस रस्त्यावरील वायरलेस फाट्याजवळ असलेल्या समाधान लॉजवर पोलिसांनी बुधवारी (दि. २९) मध्यरात्री छापा टाकून सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या मॅनेजर-चालकाविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री १२:४५ वाजेच्या सुमारास गिरीम गावच्या हद्दीतील समाधान लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, आरोपी रितेश कुमार रमतारी पासवान (वय २६, सध्या रा. साहेब पॅलेस, गिरीम, मूळ रा. गया, बिहार) हा महिलांच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय चालवत असताना मिळून आला.

या कारवाई वेळी पोलिसांनी जळगाव, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, हाडपसर तसेच बिहार आणि आसाम राज्यातील एकूण ६ पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी पोलिस हवालदार निखिल बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रितेश पासवान याच्याविरुद्ध महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक बिद्री करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT