आकाशात बीम, लेझर बीम लाइट सोडण्यास बंदी File Photo
पुणे

Laser Light Ban: आकाशात बीम, लेझर बीम लाइट सोडण्यास बंदी

दोन महिने प्रकाशझोत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात आयोजित करण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांदरम्यान आकाशात बीम तसेच लेझर बीमचे प्रखर प्रकाशझोत सोडण्यास पोलिस प्रशासनाने बंदी घातली आहे. लोहगाव विमानतळापासून 15 किलोमीटर अंतरापर्यंत प्रखरझोत सोडण्यास (वायुक्षेत्र) बंदी घालण्यात आली आहे.

युद्धजन्य परिस्थिती विचारात घेत पुढील साठ दिवसांसाठी पुन्हा सुधारित आदेश दिले आहेत. आदेशाचा भंग करणार्‍यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शुक्रवारी (दि. 9) दिला. (Latest Pune News)

लोहगाव येथे हवाईदलाचा तळ तसेच नागरी विमानतळ आहे. वायुक्षेत्रात (एअर फिल्ड) प्रखरझोत सोडल्यास वैमानिकांचे डोळे दिपवून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा आदेश काढला आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तानने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’

समाज माध्यमांतून प्रसारित होणार्‍या संदेशांची खातरजमा करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. समाज माध्यमांतील संदेशांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. सायबर सुरक्षा विचारात घेऊन समाज माध्यमांतून प्रसारित करण्यात येणार्‍या फाइलकडे दुर्लक्ष करावे. शक्यतो अशा फाइल उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT