न्यूमोनियाचे वाढतेय प्रमाण, कसा असावा आहार? Pudhari
पुणे

Pneumonia Cases: न्यूमोनियाचे वाढतेय प्रमाण, कसा असावा आहार?

काही विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे न्यूमोनिया होतो.

पुढारी वृत्तसेवा

Best diet for pneumonia patients

पावसाळी हवेतील आर्द्रता आणि त्यामुळे होणारा न्यूमोनिया हा फुप्फुसांचा संसर्गजन्य आजार वाढत आहे. जिवाणू, विषाणुजन्य आजारांमुळेही न्यूमोनिया होऊ शकतो. काही विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे न्यूमोनिया होतो.

योग्य उपचार, योग्य आराम आणि योग्य आहारामुळे न्यूमोनियापासून बचाव शक्य असल्याचे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. न्यूमोनियाच्या संसर्गाशी लढण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे या काळात आहार पौष्टिक आणि पचायला सोपा असणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य आहारामुळे लवकर बरे होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, अशी माहिती आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर यांनी दिली.

न्यूमोनियामध्ये आहार कसा असावा?

  • घरी केलेला ताजा, सकस आणि स्वच्छ आहार असावा.

  • दर 2-3 तासांनी हलके खावे.

  • आहार थोडा पातळसर आणि कोमट किंवा गरम असावा.

  • शिळे, कडक आणि गार पदार्थ टाळावेत.

  • काही लोकांमध्ये दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही) कफ वाढवू शकतात.

  • तळलेले आणि तेलकट पदार्थ पचायला जड असतात आणि पचनसंस्थेवर ताण आणतात.

  • प्रक्रिया केलेले पदार्थ चिप्स, पॅक केलेले स्नॅक्स आणि जंकफूड टाळा. त्यात जास्त प्रमाणात सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हज् असतात.

  • दारू, कॅफिनमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.

न्यूमोनियामध्ये काय खावे?

  • भरपूर द्रवपदार्थ : पाणी, भाज्यांचे किंवा चिकनचे गरम सूप, तुळस किंवा पुदिना घातलेला गरम चहा, मुगाचे कढण

  • प्रथिनेयुक्त पदार्थ : अंडी, चिकन, मासे, डाळी, कडधान्ये (मूग, मसूर), सोयाबीन, पनीर, टोफू

  • व्हिटॅमिन आणि खनिजे : संत्री, लिंबू, किवी, पेरू, आवळा आणि बेरीसारखी फळे, पालक, मेथी आणि बोकोली, लसूण, आले आणि हळद

  • कार्बोहायड्रेट : बाऊन राइस, ओट्‌‍स आणि संपूर्ण गव्हाची पोळी, खिचडी, दलिया आणि भाज्या घातलेला उपमा

काही संशोधनानुसार, जेव्हा शरीर कार्बोहायड्रेट्‌‍स पचवते तेव्हा चरबीच्या तुलनेत अधिक कार्बन डायऑक्साइड तयार होतो. फुप्फुसांचा जुनाट आजार असलेल्या लोकांसाठी हे हानिकारक असू शकते. कारण, त्यांना कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. न्यूमोनियामध्येही श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो, त्यामुळे कमी कार्बन डायऑक्साइड उत्पादन फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे कर्बोदके कमी खावीत.
- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT