प्रसाद जगताप
पुणे : पीएमपीच्या 'पुष्पक' या शववाहिनी बसची वर्षभरात 2 हजार 772 नागरिकांनी सेवा घेतली आहे. त्याद्वारे पीएमपीला 8 लाख 31 हजार 600 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सेवा घेणार्यांची संख्या पाहता खासगी रुग्णवाहिकांच्या तुलनेत पीएमपीची 'पुष्पक' बससेवा सर्वसामान्यांना परवडणारी ठरत असून, गरिबांना मोठा आधार बनली आहे. पीएमपी प्रशासनाने पुणे शहरात 4 व पिंपरी-चिंचवड शहरात 2 अशा एकूण 6 बसची व्यवस्था केली आहे.
इथे साधू शकता संपर्क
पीएमपीची पुष्पक बससेवा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन्हीकडे आहे. यात पुण्यामध्ये गाडी बुक करायची असेल तर 020-24503211 / 24503212 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच पिंपरी-चिंचवड शहराकरिता 020-27422001 / 27422224 या क्रमांकावर संपर्क करावा. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे.
'पुष्पक'चे दर
एकेरी सेवेसाठी – 300 रुपये
दुहेरी सेवेसाठी – 600 रुपये
(अंतर जास्त असो किंवा कमी,
दर सारखेच असतात.)
असा झाला पुष्पकचा वापर
अ.क्र. महिना मासिक मासिक
उत्पन्न फेर्या
1) जानेवारी 66, 300 221
2) फेब—ुवारी 52,800 176
3) मार्च 66,900 223
4) एप्रिल 59,100 197
5) मे 60,900 203
6) जून 57,900 193
7) जुलै 74,700 249
8) ऑगस्ट 81,300 271
9) सप्टेंबर 75,600 252
10) ऑक्टोबर 75,600 254
11) नोव्हेंबर 73,500 245
12) डिसेंबर 86,400 288
एकूण उत्पन्न – 8 लाख 31 हजार 600
एकूण फेर्या (वापर) – 2 हजार 772