पुणे

पिंपरी : वायसीएममध्ये नाही दातांच्या सर्वसमावेशक उपचारांबाबत व्यवस्था

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात सुसज्ज असा दंतशास्त्र विभाग बनविण्यात आला आहे. मात्र, आवश्यक असणारे मनुष्यबळ, साधन सामग्री नसल्यामुळे महागडया दंतरोगावरील उपचारासाठी सर्वसामान्यांना दातांच्या खासगी दवाखान्यांवर अवलंबून रहावे लागते.

लोकसंख्येच्या साधरणपणे 60 ते 70 टक्के रुग्णांना दातांचे आजार असतात आणि शासकीय आणि स्तरावर दातांच्या सर्वसमावेशक उपचारांबाबत परिपूर्ण व्यवस्था वायसीएममध्ये नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दंतशास्त्र विभागात अनेक रुग्ण येत असतात. यामध्ये दातांचे, तोंडाचे आजार,

दंतक्षय त्यामुळे होणार्‍या व्याधी तोंडाचा कर्करोग आणि कर्करोग पूर्व लक्षणे याचबरोबर रस्त्यावरील अपघात हाणामार्‍या यामध्ये चेहर्‍यावर झालेल्या इजा,

जबडा व जबड्यांची हाडे तुटणे अशा रुग्णांना जबड्याच्या आणि तोंडाच्या विविध शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. म्युकरमायकॉसिस या आजारांच्या ही अनेक शस्त्रक्रिया यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये झालेल्या आहेत. अनेक रुग्ण या आजारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येत असतात. तोडांच्या विविध शस्त्रक्रिया याठिकाणी होतात.

गोरगरीबांना कमी पैशांत उपचार मिळतात म्हणून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयाच्या सर्व विभागामध्ये अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे व सोयी सुविधांमुळे मात्र रुग्णांचे हाल होत आहेत.

खासगी रुग्णालयाचा विचार केला तर दाताचे उपचार हे सर्वसामान्यांसाठी खूप महागडे उपचार ठरत आहेत. खासगी कोणत्याही रुग्णालयात किंवा दवाखान्यात एका रुट कॅनलच्या ट्रिटमेंटला 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो.

त्यासोबतच इतर उपचारासाठी दोन ते चार हजारपर्यंत खर्च येत असतात. जो सर्व सामान्य आणि गोरगरीब यांना परवडणारा नसतो. हेच उपचार वायसीएम रुग्णालयात अगदी कमीत कमी दरात केले जावू शकतात.

याठिकाणी सर्व यंत्रणा देखील आहे. मात्र, याठिकाणी दिवसाला फक्त दोन किंवा तीनच तेही निवडक रुग्णांना उपचार दिले जातात. बरेचजण उपचार परवडत नसल्यामुळे दातांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात.

यासाठी वायसीएममधील दंतशास्त्र विभाग सक्षम बनवणे आवश्यक आहे. दंतरोग विभागासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, साधन सामग्री मिळणेबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी रुग्णांची मागणी आहे.

रुट कॅनल आदी उपचारांसाठी जी साधनसामग्री लागते ती पुरेशी नसते. तीन वर्षांपासून त्याचे टेंडर निघत आहे. त्यामुळे जे आहेत त्यामध्ये फक्त निवडक उपचार केले जातात.
– डॉ. यशवंत इंगळे,दंतशास्त्र विभाग प्रमुख

वायसीएमच्या दंतशास्त्र विभागामध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही. तसेच उपचारासाठी लागणारी साधनसामग्री पुरेशी नाही. प्रशासनाच्या मदतीने जितके होईल तेवढे देण्याचा प्रयत्न करत आहोत. साधनसामग्रीसाठी आम्ही मागणीही केली आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे,अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT