पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. महिलेची गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 10 ऑक्टोबर 2021 नंतर वेळोवेळी डांगे चौक येथील एका लॉजवर घडली.
रुपेश शेषेराव सावळे (28, रा. शेलगाव, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने बुधवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश याने फिर्यादी महिलेसोबत प्रेमाचे नाटक केले. महिलेशी जवळीक साधून तिचा विश्वास संपादन करीत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला डांगे चौक येथील एका लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान फिर्यादी महिला सहा महिन्यांची गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने लग्नास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.