पुणे

Pimpri News : आरक्षणासाठी कार्ला तलावात तरुणांचे आंदोलन

अमृता चौगुले

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी युवकांनी सोमवारी कार्ला तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. परंतु, पोलिस प्रशासनाच्या विनंतीनंतर हे आंदोलन थांबविण्यात आले.

कार्ला येथे उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील 38 गावांतील सकल मराठा समाजाने कार्ला येथे चक्री उपोषण सुरू केले आहे. तसेच, भाऊसाहेब हुलावळे, कैलास पडवळ, संदीप तिकोणे, प्रकाश शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी सकाळी समीर हुलावळे, अनिल हुलावळे, गणेश वायकर, सतीश मोरे, योगेश हुलावळे, गणेश हुलावळे, संकेत भानुसघरे या युवकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. या वेळी एकच मिशन मराठा आरक्षण, थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय, अशा घोषणा देण्यात आल्या. युवकांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने याठिकाणी जमले होते. पोलिस प्रशासनाच्या विनंतीनंतर हे आंदोलन थांबविण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT