पुणे

Pimpri News : नाशिक फाटा लूप वाहतुकीस खुला

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वतीने कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकातील गेली दहा वर्षे बंद असलेला लूप सोमवारी (दि.1) वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या मार्गाने आलेल्या वाहनचालकांना पुण्याच्या दिशेने जाणे सुलभ होणार आहे. लांबपर्यंत वळसा मारून येण्याची कसरत बंद होणार आहे. नाशिक फाटा चौकात भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डाण पूल आहे.

उड्डाण पुलावरून पुण्याकडे जाण्यासाठी खाली उतरणारा लूप बांधण्यात आला होता. हा लूप महामेट्रोचे काम सुरू असल्याने आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महामेट्रोचे काम पूर्ण झाले असल्याने सोमवारपासून हा लूप वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या वेळी महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता विजयसिंह भोसले, भोसरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक साळुंखे आदी उपस्थित होते. या लूपमुळे वाहनांची कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे सहशहर अभियंता ओंभासे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT