पुणे

Pimpri News : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा

Laxman Dhenge

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाविषयी प्रक्षोभक वक्तव्य करून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत मराठा समाजाची बदनामी केल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसीलदार विक्रम देशमुख, पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात मराठा समाजास आरक्षण मिळणेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे जनआंदोलन उभारलेले असून त्याकामी सरकार व मराठा समाजाचे कार्यकर्ते यांचेमध्ये बोलणी चालू आहे. असे असताना अन्न व भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार मराठा समाज व इतर समाजाचे लोकांमध्ये जातीय वाद निर्माण होतील, अशी प्रक्षोभक व बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्र राज्यामधील सामाजिक वातावरण दूषित करून त्याद्वारे जाती जातीमध्ये भांडण तंटे अथवा जातीय दंगली होतील, अशी परिस्थिती निर्माण करत आहे.

यावावत मराठा समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येऊन अशा प्रकारचे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे व मराठा समाजाची बदनामी केलेबाबत मंत्री भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT