पुणे

Pimpri News : दोन दिवसांत 26 लाखांचा दंड वसूल

Laxman Dhenge

पिंपरी : महापालिकेच्या वायुप्रदूषण नियंत्रण पथकाने गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि.9) 13 लाख 62 हजार आणि गुरुवारी (दि.8) 12 लाख 92 हजार 250 रुपयांचा असा एकूण 26 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने 32 प्रभागांमध्ये 16 पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांकडून अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यातील अनेक ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 1981 नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्र व व्हिडिओग्राफीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. नोटीस देऊन कामाची जागा सील केली जात आहे. नोटीस बजावलेल्यांची संख्या, वसूल केलेला दंड व दररोज होणार्या कारवाईची नोंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT