पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित नव्या 4 रुग्णांची नोंद सोमवारी (दि.18) झाली. शहरात 47 सक्रिय रूग्ण असून, ते सर्व होम क्वारंटाइन आहेत. रुग्णालयात एकही रुग्ण दाखल नाही. तर, 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
दिवसभरात 556 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, 290 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. शहरात 65 मायक्रो कन्टेन्मेंट झोन शिल्लक आहेत.