पुणे

Pimpri Crime : रिकव्हरी एजंटला धमकावण्यासाठी भिंतीवर गोळीबार; मोशी येथील घटना

backup backup

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या रिकव्हरी एजंटला धमकावण्यासाठी एकाने भिंतीवर गोळीबार केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ११) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास श्रीकृष्ण सोसायटी, जलवायू विहार, मोशी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी अमोल बापू ठोंबरे (३०, रा. अमृता कृपा सोसायटी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रशांत सुतार (रा, श्रीकृष्ण सोसायटी, जलवायु विहार, मोशी प्राधीकरण) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीच्या यरंडवणा शाखेतील थकीत कर्ज वसुलीचे काम करतात. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ते एसएस इंजिनिअर्स फर्मच्या मालक आरोपीच्या पत्नी शारदा प्रशांत सुतार यांच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी प्रशांत सुतार याने घरी येवुन त्यांचे हातातील पिस्तुल फिर्यादी यांच्यावर रोखुन 'मी तुला आता गोळी घालून जीवे मारुन टाकतो" अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना आणखी घाबरवण्यासाठी भिंतीवर गोळी झाडली. भेदरलेल्या फिर्यादी यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. पोलीस आपल्याला पकडणार, या भीतीने आरोपी प्रशांत सुतार याने घटनास्थळावरून पोबारा गेला.

रहिवासी परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्यासह स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांच्या आतच आरोपीला बेड्या ठोकल्या.

SCROLL FOR NEXT