पुणे

Pimpri Crime News : मोबाईल चोरणार्‍या दोन डिलिव्हरी बॉयना अटक

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फ्लिपकार्टमधून 38 मोबाईल लंपास करणार्‍या डिलिव्हरी बॉयना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. आशिष भाऊसाहेब भोसले (22, रा. रमाबाईनगर, पिंपरी), पीयूष गोविंद मोहिते (23, रा. नेवाळेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला इन्स्टाकार्ट सर्विस या फ्लिपकार्टच्या ऑनलाईन कुरिअर कंपनीत काम करतात.

त्यांच्या कंपनीत आरोपी आशिष हा डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या बिग बिलियन डे निमित्त नागरिकांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यामुळे ऑनलाईन कुरिअर कंपन्यांचा ताण वाढला. इन्स्टाकार्ट सर्विसेस या कंपनीतदेखील कामाचा ताण होता. याचा गैरफायदा घेऊन आरोपी आशिष आणि त्याच्या साथीदारांनी कंपनीच्या हबमधून नऊ लाख 47 हजार 160 रुपये किमतीचे 38 मोबाईल चोरून नेले.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदू गिरे, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित यांनी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT