पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: कामगार भवन जवळ कचराकुंडी नसल्यामुळे गांधीनगर वसाहतमधील नागरिकांना कचरा टाकण्यास अडचणी येत आहेत. या भागातील नागरिकांनी गेली अनेक दिवसांपासून कचरकुंडी ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे. पंरतु, अद्यापही महापालिकाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दररोज वर्दळ असते. येथे स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून अनुयायी येत असतात.त्यामळे इतर दिवशीही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
इथून जवळच काही अंतरावर कामगार भवन आहे. याच इमारतीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यालय, पीएमपीएल बसचे पास वितरण केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना, बाजूला सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले स्मारक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते.
गांधीनगर वसाहत येथील नागरिक मनोज गजभार यांनी सांगितले, की या वसाहतीत कचरकुंडी नसल्याचे अनेक वेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लक्षात आणून दिले आहे. परंतु, अद्यापही कचरकुंडी ठेवली नाही. परिसरात सकाळी एक घंटा गाडी येत आणि सकाळचा कचरा घेऊन जाते. त्यानंतर मात्र कचरा टाकण्यास नागरिकांना अडचणी येतात. अशातच पिंपरीतील गांधीनगर वसाहतमधील नागरिकांना कचरकुंडी अभावामुळे कचर्याच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आणि लवकरात लवकर कचराकुंडी बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हेही वाचा: