पुणे

चिखली, मोशी परिसरातील विनापरवाना फलकांवर कारवाई

अमृता चौगुले

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरात लावण्यात येणार्‍या विनापरवाना फ्लेक्स, किऑक्स व फलकावर रविवारी कारवाई करण्यात आली. तसेच, जप्त केलेले हे साहित्य नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकाच्या वतीने नियमितपणे कारवाई केली जात आहे. विनापरवाना लावलेले फ्लेक्स व फलक तसेच, विजेच्या खांबांवर लावलेले किऑक्स काढून जप्त केले जात आहेत. चिखली, मोशी परिसरातील अनेक किऑक्स व फ्लेक्स काढून जप्तीची कारवाई करण्यात आली.

वाहतुकीस अडथळा

महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, वाढदिवसाच्या शुभेच्छा, स्वागत असे अनेक फ्लेक्स कोठेही लावण्यात येतात. विनापरवाना फ्लेक्स, किऑक्स व फलकामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. विशेषत: चौकात अशा फ्लेक्स व फलकांची गर्दी दिसते. त्यामुळे वाहतूक कोंडीस अडथळा होतो. तसेच, अघपात घडण्याची भीती असते. या फ्लेक्स, फलक व किऑक्सवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT