पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रस्त्याने जाणार्या महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 10 मार्च आणि 25 एप्रिल रोजी विशालनगर येथे घडली.
इम्रान खान (30, रा. विशालनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा वेळोवेळी पाठलाग केला.दरम्यान, फिर्यादी विशालनगर येथील रस्त्यावर चालत असताना आरोपी त्यांच्याजवळ आला.
त्याने 'तू मुझे बहुत अच्छी लगती हो, आती क्या मेरे साथ घुमने' असे म्हणून लगट करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी आरोपीला नकार दिला. मात्र, तरी देखील आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी 25 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता विशालनगर येथे असताना आरोपीने त्यांच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.