पुणे

पिंपरी : मुंबई- बंगळूर महामार्गावरील नदी पात्रालगतच्या खड्ड्यात बस कोसळली

अविनाश सुतार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून खासगी बस नदी पात्रालगत असलेल्या खड्ड्यात (bus crashed) कोसळली. सोमवारी (दि.२३) पहाटे पाचच्या सुमारास मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाकड येथे हा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस मुंबई- बंगळूर महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने जात होती.  वाकड येथे चालकचा ताबा सुटल्याने बस मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या कठड्याला  (bus crashed) धडकली. बसचा वेग जास्त असल्याने बस बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्याचे समोर आले. बसचालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर काही तास वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी दोन क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT