पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीचे 25 टक्के आरक्षण जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत आरटीईचे 927 प्रवेश झाले आहेत.
या वर्षी 170 शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. तर आरटीईसाठी 3 हजार 324 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये आकुर्डी उन्नत केंद्रंतर्गत येणार्या शाळांमध्ये 2 हजार 161 जागांपैकी 587 प्रवेश झाले आहेत तर पिंपरी उन्नत केंद्रातर्गत येणार्या शाळांमध्ये 1087 जागांपैकी 340 जागांवर प्रवेश झाले आहेत.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत अद्याप 50 टक्के देखील प्रवेश झालेले नाहीत. प्रवेश प्रक्रियेसाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
इतक्या संथ गतीने प्रवेश प्रक्रियेचे काम सुरु असल्याने दिलेल्या मुदतीत उपलब्ध जागांवर प्रवेश होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.