पुणे

पिंपरीत ४२ अंश सेल्सीअस

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. दिवसेंदिवस उकाड्यात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सोमवारी तर तापमानाने उच्चांक गाठला असून पिंपरी चिंचवड शहरात 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षातील एप्रिल महिन्यातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे.गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तापमान 38 अंशाच्या पुढे आहे.

उष्णतेची लाट कमी होईल अशी आशा असतानाच तापमानात होणारी वाढीने अंगाची काहीली आणि बैचेनी निर्माण होत आहे. उन्हात फिरणार्‍या नागरिकांना डोकेदुखी, चक्कर, मळमळ आणि उलटीचे त्रास जाणवत आहेत.

उन्हापासून संरक्षण म्हणून टोपी, छत्री, गॉगल घेतले तरी उन्हात फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे उन्हात रस्त्यावर गर्दी कमी होवू लागली आहे.

वाढलेल्या तापमानाच्या पार्‍यामुळे फॅनची हवा देखील दमट झाली आहे. दिवस अन रात्रीही घामाघूम झालेले नागरिक थंडावा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

शनिवारी (दि.2) तापमान 41 अंश नोंदविले गेले. रविवारी (दि.3) 41.8 अंश तापमानाची नोंद झाली. तर सोमवारी (दि.4) 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

दरवर्षी एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी तापमान 40 किंवा 41 अंश इतके असते. एखादा दिवस तीव— उकाड्याचा अनुभवयाला मिळतो.

मात्र, यावेळी सलग दोन दिवस 41 अंश तापमान आणि आज 42 अंश तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांना उकाड्याने त्रस्त झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंड ठिकाणाचा आसरा शोधताना दिसत आहेत.

SCROLL FOR NEXT