पिंपळे गुरव : नवी सांगवी ते कृष्णा चौक रस्त्यावर दररोजची मोठ्या प्रमाणात अवजड, दुचाकी, चार चाकी गाड्यांची वाहतूक सर्रास पाहायला मिळते. याच रस्त्यावर माल वाहतूक तसेच इतर वाहने बेकायदारित्या पार्किंग केल्या जात असल्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होत आहे.
या वाहतूककोंडीतून नागरिकांना चालण्यास अडचण येत आहे. सामानाच्या किंवा विविध कामांकरिताचे टेम्पो रस्त्यावर पार्किंग केले जातात. त्यातून भरधाव येणार्या वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. याच रस्त्याचा एका बाजूस दुचाकी वाहन पार्क केली जातात. त्यातून रस्त्याच्या मधोमध गाड्या, माल वाहतुकीचे टेम्पोही लावले जात असल्यामुळे नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.
वाहतूक विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. तसेच, बेकायदा वाहने रस्त्यावर पार्क करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
हेही वाचा: