पुणे

Pimpari : देहूतील दुकानावरील पाट्या मराठीत करा मनसेचा आंदोलनाचा इशारा

Laxman Dhenge

देहूगाव : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकानांवर असलेल्या सर्व पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय दिला आहे. तरीही देहूगाव परिसरातील अनेक दुकानांवरील पाट्या या अन्य भाषेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व दुकानांवरील पाट्या या मराठीत कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 25 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत संपली आहे. तरीही श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत हद्दीत अनेक दुकानांवरील पाट्या मराठीत भाषेत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी देहूगाव मनसे शाखेच्या वतीने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या वेळी मनसे शहराध्यक्ष बालाजी तांबे, उपाध्यक्ष सार्थक काळोखे, शहर संघटक गणेश परदेशी, अजय कांबळे, दत्ता बंडगर, कांशीराम जोग, ऋषिकेश पिंजण, वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुशांत गायकर आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT