ओतूर: देव दर्शनासाठी निघालेली देवी भक्त महिलांनी भरलेली पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतावरून घसरून रस्त्यालगत असलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडल्याने टेम्पोतील एक महिला ठार झाली असून सुमारे १४ महिला जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये इतर ६ मुलांचाही समावेश असल्याची माहिती ओतूर पोलिस सूत्रांनी दिली आहे.
मंगळवारी( दि. ३०)मढ ते तळेराण (ता.जुन्नर) शिंदळदरा परिसरात पिकअप ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतावरुन घसरली व खोल खड्ड्यात पडली. (Latest Pune News)
या अपघातात कविता विठ्ठल गवारी ही महिला जागीच ठार झाली असून गोदाबाई काळूराम बालचीम,वैष्णवी अनिल गवारी,अनिता सचिन लोहकरे,वैशाली यशवंत गवारी,लक्ष्मी बाळू बालचीम,झूम्बर बाई लोहकरे,हर्षल बाळू बालचिम,जिजाबाई दशरथ बालचीम हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार संदीप भोते , किशोर बर्डे, हे तात्काळ घटनास्थळी पोहचले व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.