पर्वती मतदारसंघात जनतेचा ’सांगली पॅटर्न’ राबविण्याचा निर्धार Pudhari News
पुणे

Maharashtra Assembly Polls: पर्वती मतदारसंघात जनतेचा 'सांगली पॅटर्न' राबविण्याचा निर्धार

मतदारसंघात लागलेल्या फलकांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: पर्वती मतदारसंघात लावण्यात आलेल्या ‘सांगली पॅटर्न’ची सध्या जोरदार चर्चा आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांना उमेदवारी न दिल्याने, पर्वती मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह, नागरिकांनीही पर्वती मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा निर्धार केला आहे, अशा आशयाचे बॅनरसुद्धा पर्वती मतदारसंघात सर्वत्र लावण्यात आले आहेत.बागुल हे पर्वती मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते.

मात्र, बागुल यांच्यासारखा विकास करण्याची धमक असलेला उमेदवार असूनही, महाविकास आघाडीत काँग्रेसला हा मतदारसंघ घेचून आणण्यात अपयश आले. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही हा मतदारसंघ काँग्रेसकडे मिळू शकला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे.

शहरातील आणि पंचकृषीतील हजारो वृद्ध माता- पित्यांना काशी यात्रा घडविणारा श्रावणबाळ, राजीव गांधी ई- लर्निंग ही गोरगरिबांची शाळा चालविणारा व त्या माध्यमातून अनेक मुलांना मोठमोठ्या हुद्यांवर पोहोचविणार्‍या बागुल यांच्यावर वारंवार अन्याय झाला आहे, अशा भावना पर्वती मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

गेली कित्येक वर्षे समाजकारण व राजकारणात आपल्या कर्तबगारीने मनाचे स्थान मिळविणार्‍या बागुल यांना वारंवार डावलले जात आहे. त्यामुळे चांगला कार्यकर्ता व पर्वती मतदारसंघाचा विकास करण्याकरिता बागूल यांना निवडून देणे हे पर्वतीच्या नागरिकांच्याच हिताचे आहे हे लक्षात घेऊन, पर्वतीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्न राबविण्याचा निर्धार केला आहे व त्याबाबतचे पर्वतीमध्ये बॅनरही झळकत आहेत. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT