पिंपरी : रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील दीड लाखाची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी बारा वाजताच्या सुमारास रिव्हर व्ह्यू चौक, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रिव्हर व्ह्यू चौकातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचा दागिना चोरून नेला. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.