पुणे

पिंपरी चिंचवड: महापालिका तिजोरीत महिनाभरात 65 कोटी जमा………..

अमृता चौगुले

पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेस मिळकतकर बिलातून पहिल्या एका महिन्यात एकूण 65 कोटींचा भरणा झाला आहे. एकूण 56 हजार 815 मिळकतधारक बिल भरून मोकळे झाले असून, त्यांनी सवलतीचा लाभ घेतला आहे.

त्यात सर्वांधिक 47 हजार 415 जणांनी ऑनलाइन माध्यमातून बिल भरले आहेत. तो एकूण भरणा सर्वांधिक 52 कोटी 63 लाख इतका आहे. रोखीने 6 हजार 650 जणांनी एकूण 6 कोटी 53 लाखांची बिले भरली आहेत. धनादेशाद्वारे 1 हजार 361 जणांनी 3 कोटी 95 लाखांचा भरणा केला आहे. ईडीसीने 703 जणांनी एकूण 72 लाख 67 हजारांची बिले भरली आहेत. डीडीद्वारे केवळ 9 जणांनी 11 लाख 50 हजारांची बिले भरली आहेत.

बिल भरणा करण्यात निवासी मिळकती सर्वांधिक 53 हजार 78 आहेत. त्यांनी 52 कोटी 78 लाखांचा भरणा केला आहे. तर, बिगरनिवासी 2 हजार 666 मिळकती आहेत. त्यांनी 7 कोटी 75 लाखांचा भरणा केला आहे. औद्योगिक 187 मिळकती, मिश्र 656 मिळकती आणि मोकळ्या जमिनी 246 जणांनी बिले भरली आहेत. सर्वांधिक 15 कोटी 16 लाखांचा भरणा वाकड विभागीय करसंकलन कार्यालयात झाला आहे. तेथे 11 हजार 66 जणांनी कर भरला आहे.

थेरगाव विभागीय कार्यालयात 6 हजार 157 जणांनी एकूण 7 कोटी 5 लाखांचा भरणा केला आहे. पिंपरी गावातून 6 कोटी 15 लाख आणि सांगवी कार्यालयातून 6 कोटी 4 लाखांचा भरणा झाला आहे. सर्वांत कमी भरणा पिंपरी कॅम्प व तळवडे कार्यालयात झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT