पुणे

पासपोर्टसाठी वाढली अर्जांची संख्या, यंदा सप्टेंबरअखेर 2 लाख 64 हजार 160 अर्ज दाखल

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आंतरराष्ट्रीय प्रवासात आता वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातून पासपोर्टच्या मागणीतही वाढ झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍या अर्जदारांना सध्या दीड महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळत आहे. गेल्या वर्षी (2021-22) पासपोर्ट कार्यालयाकडे 2 लाख 41 हजार 928 अर्ज आले होते. यंदाच्या आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरीस 2 लाख 64 हजार 160 अर्ज आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पासपोर्टची मागणी वाढली आहे.

कोरोना काळात परदेशी प्रवासावर बंदी होती. त्यातच अनेकांच्या पासपोर्टची मुदतही संपली होती, परंतु पासपोर्ट ऑफिसच बंद होते. त्यामुळे पासपोर्ट नूतनीकरणाला (रिन्युएशन) विलंब झाला. आता मात्र, परदेशी प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे परदेशातील आपले नातेवाईक, मुले-मुली, मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. त्यासाठीच पासपोर्टकरिता अर्ज वाढले आहेत, अशी माहिती पासपोर्ट कार्यालयाच्या पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बैठका, परिषदा, स्पर्धांही आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच परदेश दौरेही वाढले आहेत. गेल्या चार महिन्यांत पासपोर्टची मागणी वाढल्याने अपॉईंटमेट्सच्या तारखाही लांबल्या आहेत. पासपोर्ट अधिकारी डॉ.अर्जुन देवरे म्हणाले, 'पासपोर्ट कार्यालयाकडे येणार्‍या अर्जांमध्ये नवीन पासपोर्ट आणि पासपोर्टचे नूतनीकरण असे दोन्ही प्रकारचे अर्ज येत आहेत. गेल्या वर्षी आलेल्या अर्जांपेक्षा यंदाची संख्या नऊ महिन्यांतच वाढली आहे.'

SCROLL FOR NEXT