वेल्हे: वरसगाव धरण 100 टक्के भरल्यानंतर बुधवारी (दि. 3) पानशेत धरणही पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता खडकवासला धरणाचे दरवाजे उघडून मुठा नदीपात्रात पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला.
सध्या नदीत 1 हजार 263 क्युसेक पाणी सोडले जात असून, पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
सायंकाळी 5 वाजता खडकवासला धरणसाखळीत एकूण 29.06 टीएमसी (99.70 टक्के) पाणीसाठा झाला होता. धरणक्षेत्रात गेल्या 6 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून रिमझिम व हलक्या सरी कोसळत असल्याने पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे वरसगाव धरणाच्या मुख्य सांडव्यातून सायंकाळी 5 वाजता 744 क्युसेक पाणी सोडण्यात आले.
तसेच वरसगाव व पानशेत धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून प्रत्येकी 600 क्युसेक पाणी, तर टेमघर धरणातून 509 क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, ’पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे 100 टक्के भरून वाहत आहेत. खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग सुरू केला आहे. पाण्याचे प्रमाण वाढल्यास अतिरिक्त पाणी मुठा नदीत सोडले जाईल.’
खडकवासला धरण साखळी
एकुण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी
बुधवार अखेर पाणीसाठा
29.06 टीएमसी 99.70 टक्क