पुणे

पुणे : आग लागलेल्या गोदामाच्या मालकाला अटक

अमृता चौगुले

पुणे/वाघोली; पुढारी वृत्तसेवा : डेकोरेशन गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोदामच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. आशिष सर्जित अग्रवाल (बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 5 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. यामध्ये बिजेन पात्रा (वय 28), विश्वजित सेन (वय 33), कमल ब्रार (वय 29, तिघे रा. मैथनीपूर, पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाला होता.

अग्रवाल याने गोदामाच्या खोलीमध्ये कामगारांच्या राहण्याची सोय केली होती. याबाबत त्याने अग्निशमन विभाग, विद्युत, बांधकाम विभाग तसेच पोलिस विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. कामगार राहत असलेल्या खोलीमध्ये सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना न करता सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका अग्रवाल याच्यावर ठेवण्यात आला आहे.

वाघोलीतील उबाळेनगर भागात अग्रवाल याचे शुभ्र सजावट मंडप साहित्य केंद्राचे गोदाम आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास गोदामात बारा कामगार जेवण करत होते. अचानक आग लागल्याने कामगार बाहेर पळाले. कामगार बिजेन पात्रा, विश्वास सेन आणि कमल गोदामात आग लागल्यानंतर अडकून पडले. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला होता.

SCROLL FOR NEXT