पुणे

बेल्हे : अपंगत्वावर मात करीत तरुण बनला कुटुंबाचा आधार !

अमृता चौगुले

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य म्हणजे मनुष्यजन्म. त्याचे सार्थक करण्यासाठी स्वतःचे ध्येय निश्चित करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सागर सुभाष माळी या तरुणाने कंबरच कसली. अपंगत्व कमी व्हावे म्हणून तब्बल 5 शस्त्रक्रिया झाल्या. तरीही अपंगत्व झुगारून ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अडचणी आल्या तरी त्या सुटतात या आत्मविश्वासावर थेट लघुउद्योजक बनून ओळख निर्माण केली आहे नारायणगाव येथील सागर सुभाष माळी यांनी.

हिंदवी स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जुन्नरचे नाव इतिहासात अजरामर झाले. याच जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव येथील माळी परिवारातील सागरने अतिशय कमी वयात स्टार्टअपच्या माध्यमातून युवापिढीला संदेश दिला आहे. त्यांचे शिक्षण बी.टेक. झालेले असून, तो आणि आई-वडील असे त्याचे कुटुंब. त्याच्या उजव्या हातावर तब्बल 5 शस्त्रक्रिया झाल्यात. सागर हा जन्मापासूनच अपंग. हातावर जन्माच्या 15 व्या दिवशीच शस्त्रक्रिया झाली. दहावीत होईपर्यंत तब्बल 5 शस्त्रक्रिया झाल्या. मात्र, या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या नाही.

टर्निंग पॉईंट : 2021 मध्ये त्याच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्याने चायनिज फुलांचे फ्लॉवरपाट बनवून तालुक्यात आठवडे बाजार आणि यात्रा तसेच जत्रेत विक्री सुरू केली. ठिकठिकाणी हा व्यवसाय करण्यासाठी आणि फिरण्यासाठी टू व्हीलरचा कलात्मक बदल करून व्यवसाय सुरू केला. गावोगावी व्यवसायाच्या निमित्ताने भ्रमंती करताना व्यवसायिक ओळखी निर्माण झाल्या. लघुउद्योजक बनलेल्या सागरने स्वतःच्या अपंगत्वावर मात करीत कष्ट आणि चिकाटीच्या जोरदार यश मिळवले. त्याने समाजातील तरुणवर्गाच्या डोळ्यांत अंजन घालत त्यांना एक नवी दिशा दिली आहे. यावेळी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. ते म्हणाले शिवसृष्टीसाठी राज्य सरकारने ५० कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT