Koyta Attack Pudhari
पुणे

Otur School Koyta Attack: ओतूरमध्ये परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

दहावीच्या परीक्षेदरम्यान वर्गात घुसून वार; विद्यार्थ्याने हातावर झेलल्याने थोडक्यात बचाव

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रात एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर वर्गात घुसून परीक्षार्थी विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला,या प्रसंगी हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याने मानेवर झालेला वार हातावर झेलल्यामुळे तो बालंबाल बचावला असल्याचे जखमी विद्यार्थ्याने माहिती देताना सांगितले आहे.

सदर प्रकार आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला.त्यामुळे ओतूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जुन्या वादातून ही गंभीर घटना घडली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे, पोलिसांनी कोयताधारी अल्पवयीन आरोपी व त्यासोबत असलेले आणखी चार विद्यार्थी यांना ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य गंभीर प्रकार टळला. संबंधित अल्पवयीनाकडील कोयता जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT