पुणे

नगर-कल्याण मार्गावरील ओतूरचा मोनिका चौक बनला मृत्यूचा सापळा

अमृता चौगुले

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर येथील मोनिका चौकात एकापाठोपाठ एक होणार्‍या अपघातांच्या मालिकेने मोनिका चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर वेगवान धावणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत आहेत. चौक परिसरातील रस्त्यांवर दुभाजकांची गरज आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. ओतूरच्या मोनिका चौकात तर अपघातांची मालिकाच सुरू आहे.

येथे एक मार्ग ओझर नारायणगावकडे जातो तर समोरचा रस्ता ओतूर गावठाणात जातो. महामार्ग नगर व कल्याण मुंबईकडे जातो. चौकात दि.1 रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान कार व ट्रकचा अपघात झाला. अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याच चौकात जर सर्कल व रस्ता दुभाजक असतील तर असे अपघात होणारच नाहीत, असा घटनास्थळावरील गर्दीतून सूर ऐकावयास येत होता. कल्याण-नगर महामार्गावर आवश्यक सूचना फलक, स्पीड ब—ेकर बसवणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. वेगावर नियंत्रण येण्याकामी उपाययोजनांचा अभाव आहे.

नगर-कल्याण महामार्गावर ओतूर कॉलेज, कोळमाथा, एस टी बसस्थानक, अहीनवेवाडी फाटा या संपूर्ण परिसरात रस्ता दुभाजक, गतिरोधके, सूचना फलक, सिग्नल असणे गरजेचे आहे. मोनिका चौकात एका सर्कलची निर्मिती केल्यास संभाव्य अपघातांना टाळता येऊ शकते.

– आशिष शहा, ग्रामपंचायत सदस्य, ओतूर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT