पुणे

..अन्यथा धंगेकरांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करु : मंत्री हसन मुश्रीफ

Laxman Dhenge

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार झाली त्याबाबत  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. मुश्रीफ म्हणाले की  पुणे पोलिसांनी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. याबाबत तात्काळ चौकशी करून दोषींना बडतर्फ केले जाईल.

मी वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यापासून ससूनमध्ये ललित पाटील, उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू अशा घटना घडल्यावर तात्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात आली.  याबाबत रविंद्र धंगेकर यांना माहिती नसावी, म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. पोलिसांनी गरज भासल्यास माझे कॉल रेकॉर्डही तपासावे. धंगेकर यांनी माहिती न घेता माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT