पुणे

मोनो रेल प्रकल्पाला विरोध; कोथरूड येथे स्वाक्षरी मोहीम

Laxman Dhenge

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील कै. तात्यासाहेब थोरात उद्यानात
प्रस्तावित मोनो रेल प्रकल्पासाठी खांब उभारण्यात येणार असून, बांधकामही करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पाला उद्यानप्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. उद्यानात खुली व्यायामशाळा, योग केंद्र, विरंगुळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक आणि डायनासोर पार्कचे बांधकाम केल्यानंतर आता मोनो रेल प्रकल्पासाठी खांब उभारण्यात येणार आहेत. 10 फूट उंचीचे असलेल्या सुमारे 70 खांबांची उभारणी उद्यानात करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात चालायचे कसे, असा प्रश्न उद्यानप्रेमी नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक एकवटले आहेत. हा प्रकल्प रद्द करून उद्यानाचे नुकसान टाळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उद्यानात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून नागरिकांनी, आंदोलकांनी भूमिका मांडली. या वेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष गजानन धरकुडे, आम आदमी पार्टीचे अमोल काळे, डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गिरीश गुरनानी, काँग्रेसचे राज जाधव, नागरिक किरण आढाळगे, प्रोतम मेहता, सचिन धनकुडे आदी उपस्थित होते. अमित सिंग, अभय कुलकर्णी, सुभाष एरंडे, रेखा जोशी, श्यामला हरका, मेहरुनुमुसा शेख आदी नागरिकांनी या वेळी मोनो रेल प्रकल्पविरोधात विविध कारणे देत भूमिका स्पष्ट केली.

नागरिकांची मागणी नसताना मोनो रेलचा प्रकल्प राबवला जात आहे. जीम, झाडे, विजेचे खांच दुसरीकडे हलवावे लागतील. छोट्या जागेत मोनो रेल उभारणे व्यवहार्य नाही. या प्रकल्पामुळे उद्यानाचे नुकसान होणार असल्याने आमचा या प्रकल्पास विरोध आहे.

– श्वेता यादवाडकर

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT