दिवे: जगात संत-भगवंत आणि आई-वडील सोडून आपले कोणीच नाही. लोकांकडे पैसे भरपूर आहेत. परंतु, समाजाची सेवा करायला आणि दान करायला कोणी तयार नाही. दान केल्याने लक्ष्मी दुप्पट होते, असे प्रतिपादन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी केले.
दिवे (ता. पुरंदर) येथील माजी सैनिक दिवंगत तुळशीराम विठोबा झेंडे यांच्या स्मरणार्थ झेंडे कुटुंबीयांच्या वतीने ह.भ.प. इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते.
गंगाराम जगदाळे, सासवडच्या तेल्या-भुत्याच्या मानाच्या कावडीचे पुजारी कैलासबुवा कावडे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प. दीपक महाराज देशमुख, संतसेवक माऊलीकाका आरोटे, केतन शेटे, तेजस नवले, अमित वाकचौरे, सुनील शेटे, अभिजित जगताप, माजी सरपंच राजूशेठ झेंडे, रमेश झेंडे, पूनम झेंडे, पोलिस पाटील बाळासाहेब झेंडे, दिलीप झेंडे, सोसायटी अध्यक्ष गणपत शितकल, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, राहुल शिंदे, अमोल तांबे, मोहन महाराज घुले आदी उपस्थित होते.
कीर्तनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इंदुरीकर महाराज यांना ह.भ.प. किरण महाराज शेटे, ह.भ.प. ओंकार महाराज जगताप, ह.भ.प. गीतांजली महाराज झेंडे, ह.भ.प. संतोष महाराज राऊत, ह.भ.प. गजानन महाराज सोमटकर यांनी गायनसाथ केली.
ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, ह.भ.प. नंदराज महाराज पाटील यांनी वादनसाथ केली. अकोले येथील महामुनी अगस्ती ऋषी आध्यात्मिक गुरुकुल व आळंदी येथील पार्थराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळांची साथ केली. सूत्रसंचालन जालिंदर काळे यांनी केले.