पुणे

पुणे : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलासह सुनेवर गुन्हा ; निरगुडसर येथील घटना

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वार्‍यावर सोडून देणारा मुलगा व सुनेवर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद एकनाथ सीताराम वळसे यांनी दिली. याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडसर वळसेमळा (ता. आंबेगाव) येथील हनुमंत एकनाथ वळसे व सून सुनीता हनुमंत वळसे यांनी फिर्यादी एकनाथ वळसे व त्यांची पत्नी अनुसया वळसे यांचा सांभाळ व संरक्षणाची जबाबदारी असताना त्यांनी त्यांचा सांभाळ व संरक्षण न करता घरामधून बाहेर काढले. या मुलाने मुंबई येथे खोली घेण्यासाठी व निरगुडसर येथे घर बांधण्यासाठी फिर्यादी एकनाथ वळसे यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये घेऊन ते परत न करता शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पारगाव पोलिसांनी सून व मुलावर माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस जवान कीर्वे करीत आहेत.

नागरिकांनी आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करावा, त्यांना वार्‍यावर सोडू नये. आई-वडिलांचा छळ, त्यांना घराबाहेर काढणार्‍या मुलगा व सुनेबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
– लहू थाटे, सहायक पोलिस निरीक्षक, पारगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT