पुणे

पुणे : मुलाला मारहाण करणार्‍यावर गुन्हा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: खेळायला जाऊ नको असे सांगितले असतानाही 10 वर्षांचा चिमुकला खेळण्यास गेल्याने वडिलांनी त्याला पीव्हीसी पाइपने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.  याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात 49 वर्षीय वडिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मुलाच्या 36 वर्षीय आईने तक्रार दिली आहे.  हे कुटुंब वडकी गावातील माऊलीनगर येथे राहण्यास आहेत.

दरम्यान, त्याचे वडील दहा वर्षांच्या मुलाला बाहेर खेळण्यास जाऊ नको, असे सांगून बाहेर गेले होते. परंतु, वडील बाहेर जाताच मुलगा घरातून बाहेर खेळण्यास गेला. वडील परत आल्यानंतर त्यांना ही बाब समजली. त्यांनी रागाच्या भरात त्याला पीव्हीसी पाइपने जबर मारहाण केली. यात चिमुकला जखमी झाला आहे. पुढील तपास पोलिस  करत आहेत.

SCROLL FOR NEXT