पुणे: ऐन दिवाळीत राज्यातील हवामानात मोठे बदल झाले असून उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे. त्यामुळे उन्हात एकाच जागी खूपवेळ थांबू नका. कारण राज्याचा पारा ३६ अंशावर गेला आहे. असा सावधानतेचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.दरम्यान राज्यातील पाऊस कमी झाला असून सध्या कोकण,मध्यमहाष्ट्रात अधून मधून अवकाळीचा इशारा दिला आहे.
राज्यातील बहुतांश शहराचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशावर गेले असून गुरुवारी विदर्भातील ब्रम्हपुरीचा पारा ३६.५ अंशावर गेला होता. तर मुंबई ३५.८ तर पुणे शहरातील लोहगावचा पारा ३४.२ अंशावर गेला होता. सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत उन्हाचा दाह खूप जास्त असल्याने खूपवेळ उन्हात उभे राहिल्यास उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताना छत्री , टोपी, रुमाल, पाण्याची बाटली सोबट ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
गुरुवारचे राज्याचे कमाल तापमान...
ब्रम्हपुरी ३६.५,मुंबई ३५.८,रत्नागिरी ३५.४, जळगाव ३५, पुणे ३४.२, सोलापूर ३४.९, परभणी ३३.६, बीड ३३.२, अकोला ३४.६, अमरावती ३५.२, चंद्रपूर ३४, गोंदिया ३३, वर्धा ३३.९