पुणे: उन्हाळ्याच्या सुटीवरून परतणार्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे आणि दानापूर यादरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वेळापत्रक आणि थांबे
- गाडी क्रमांक 01417 पुणे-दानापूर उन्हाळी विशेष 28 मे 2025 (बुधवार) आणि 1 जून 2025 (रविवार) रोजी पुण्याहून सायंकाळी 7:55 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 7:30 वाजता दानापूरला पोहचेल. (Latest Pune News)
- परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01418 दानापूर-पुणे उन्हाळी विशेष 30 मे 2025 (शुक्रवार) आणि 3 जून 2025 (मंगळवार) रोजी दानापूरहून सकाळी 8:30 वाजता निघेल आणि दुसर्या दिवशी सायंकाळी 5:35 वाजता पुणे येथे पोहचेल.
- या दोन्ही दिशांच्या गाड्या दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यागर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छोकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबतील.
गाडीची रचना आणि बुकिंग
या विशेष गाड्यांमध्ये 20 आयसीएफ डबे असतील, यात 11 जनरल स्लीपर क्लास, चार एसी 3-टायर, एक एसी 2- टायर, दोन जनरल सेकंड क्लास आणि दोन गार्ड-कम-लगेज व्हॅन यांचा समावेश आहे.
मी सुट्यांमध्ये दानापूरला गेलो होतो. आता पुण्याला परतण्याची तयारी करीत होतो. पण, गाड्यांमध्ये जागा मिळणे कठीण झाले होते. आता ही विशेष ट्रेन सुरू होत असल्याचे ऐकल्यावर खूप आनंद झाला. बुकिंग लगेचच करणार आहे. रेल्वे प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतलाय, त्यासाठी त्यांचे आभार!- रवींद्र कुमार, प्रवासी