पुणे

पुणे : आता सिंहगड रस्त्यावर अतिक्रमणविरोधी पथक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणा मुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या दैनिक पुढारीच्या वृत्ताची महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. पु. ल. देशपांडे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आणि रस्त्याच्या कडेला केल्या जाणार्‍या अतिक्रमणाला पायबंद घालण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी अतिक्रमण विभागाचे पथक ठेवण्यात येणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा ते राजाराम पूल चौकापर्यंत पदपथाचे सुशोभीकरण करून पदपथाची रुंदी वाढविण्यात आली आहे. मात्र, फळे, भाजी आणि विविध वस्तूंची विक्री करणारे पदपथ सोडून मुख्य रस्त्याच्या कडेलाच बसतात. त्यामुळे सायंकाळी या ररस्त्यावर वाहतूक कोंडी होते. याबाबत दैनिक पुढारीने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे कारवाई पथ ठेवण्यात येणार असल्याचे माधव जगताप यांनी सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT