पुणे: रक्तातील साखरेवर देखरेख करणाऱ्या 'ईझी टच प्लस' या उपकरणाला यंदाचा अंजनी माशेलकर पुरस्कार मिळाला आहे.
अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुई न टोचता रक्तातील साखर 'ईझी टच प्लस' मॉनिटर करते.
पुरस्कार पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित १३ व्या सोशल इनोव्हेशन (सामाजिक नवनिर्माणाच्या) राष्ट्रीय परिषदेत टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा आणि अंजनी माशेलकर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते देण्यात आला.
'ईझी टच प्लस' चे संशोधनकर्ते राहुल आणि नेहा रस्तोगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मोबाईलप्रमाणे खिशात मावणारे.
केवळ त्याच्यावर बोट ठेवल्यावर १५ सेकंदात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सांगणारे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेले उपकरण मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहे.