Thursday water cut Pune
पुणे: मध्य पुण्यासह दक्षिण व पश्चिम पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 17) बंद राहणार असून, शुक्रवारी (दि. 18) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य वाहिनीची गळती रोखण्याचे काम करण्यात येणार असून, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत येणार्या सर्व टाक्या व केंद्रांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Pune News)
या भागांत राहणार पाणीपुरवठा बंद
पर्वती एमएलआर टाकी परिसर: शहरातील सर्व पेठा, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर इ. पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेकटाऊन, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, ठाकरे वसाहत, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर आदी.
पर्वती एलएलआर : दत्तवाडी परिसर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी : भूगाव रोड परिसर, कोकाटेवस्ती, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सागर कॉलनी, बावधन परिसर, पूजा पार्क, डुक्कर खिंड, शास्त्रीनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रोड.
गांधी भवन टाकी परिसर : काकडे सिटी, सिप्ला फाउंडेशन, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज, कुमार परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, सहजानंद, गांधी स्मारक, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, कॅनॉल रोड.
पॅन कार्ड क्लब जीएसआर टाकी : बाणेर, बालेवाडी, बाणेर, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, विधातेवस्ती, मेडीपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, शिवणे इंडस्ट्रीज, कोंढवे धावडे.
एस. एन. डी. टी. पंपिंगअंतर्गत परिसर : संपूर्ण शिवाजीनगर, संपूर्ण कोथरूड, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, जय भवानीनगर, केळेवाडी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, भांडारकर रोड, प्रभात रोड, पोलिस लाइन, लॉ कॉलेज रोड, करिष्मा सोसायटी, डी. पी. रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणा परिसर, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर इत्यादी.
चतुःशृंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, आंबेडकर वसाहत, अभिमानश्री सोसायटी.
पाषाण पंपिंग व सूस गोल टाकी परिसर : गणराज चौक, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.
जुने वारजे जलकेंद्र भाग : रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, गोकूळनगर पठार, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, गणपती माथा परिसर, एनडीए रोड.
नवे, जुने होळकर जलकेंद्र : मुळा रोड, संपूर्ण खडकी, हरिगंगा सोसायटी.
कोंढवे : धावडे जलकेंद्र : वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, न्यू कोपरे इ.